मंडळाधिकारी

फेरफार नोंदवही मध्ये नोंद केलेनंतर तलाठी सदर नोंदीबाबत काही आक्षेप असलेस 15 दिवसांची मुदत देऊन तलाठी कार्यालयात कळविणे बाबत हितसंबंधित व्यक्तींना नोटीस बजावतात.उक्त 15 दिवसात एखाद्या हितसंबंधित व्यक्तीने अशा नोंदीबाबत हरकत घेतल्यास तलाठी हे सदर हरकतीची नोंद गाव नमुना- 6ब विवाद ग्रस्त प्रकरणांची नोंदवही यामध्ये नोंद करून त्या नोंदीचा सदर नोंदीबाबत प्राप्त अर्ज ,फेरफार,तक्रार अर्ज,व गाव नमुना 6ब ची नक्कल जोडून तालुक्यात पाठवतात.अशा नोंदी पुढे तक्रार केस चालवण्यासाठी मंडळ अधिकारी यांचेकडे येतात अशा वेळी वादी व प्रतिवादी यांना नोटीस बजवावी लागते व त्यांचे लेखी युक्तिवाद घ्यावे लागतात.तसेच वेगवेगळ्या फेरफार मध्ये निकाल कसे देतात व याबाबत पूर्ण कार्यवाही कशी करायची याबाबत माहिती देणारे सदर ब्लॉगवर आजपासून "मंडळाधिकारी " या नावाने चालू करत आहोत त्यामध्ये आज  वादी व प्रतिवादी यांना  बजवणेत येणारी नोटीस नमुना पाहणार आहोत.
सदर नमुना प्राप्त करणेसाठी क्लिक करा.

1 comment:

Unknown said...

I have bit concern about this i just hope someone would help me,my case is under circle officer.The circle officer had given a date to me and arguer,I was present for the assigned date but not arguer.The circle officer told me to submit my opinion in written and did as he said.However,the circle officer is sending one more notice to the arguer.According to government rules,how many time should notice be sent to respective persons in a case?