Friday 2 March 2018

महसूल प्रश्नोत्तरे- सुधारित आवृत्ती





महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते.  
      महसूल खात्यांत अनेक वेळा तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न‍ केला तर अनेक कायद्यााची पुस्तके चाळावी लागतात.अनेक अधिकारी/कर्मचारी यांनी विविध प्रकारचे अभ्यासू व अनुभवी मार्गदर्शन करतांना, कायदेशीर तरतुदींवर अनेक उत्कृष्ठ लेख लिहिलेले आहेत. परंतु अशा लेखांतून नेमके उत्तर शोधणे काहीवेळा शक्य होत नाही.

        या गोष्टींचा विचार करून, तातडीच्या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्टीकोनातून "महसूल प्रश्नोत्तरे" ची रचना केलेली आहे. पहिल्या आवृत्ती मध्ये एकूण ३९१ प्रश्न होते सुधारित दुसऱ्या आवृत्तीमध्ये महसूल विषयक विभाग २४८ प्रश्न ,कुळकायदा विषयक विभाग ५१ प्रश्न,वारस विषयक ११० प्रश्न, न्यायदान विषयक ७६ प्रश्न असे एकूण ४८५ प्रश्न असे भाग करून प्रश्नांचे विविध संच, विषयनिहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रश्नांची उत्तरे देतांना, शक्य तिथे कायदेशीर तरतुदी, कायद्यातील कलम आणि न्यायालयीन आदेशांचा संदर्भ दिलेला आहे. यामुळे कायदेशीर अथवा न्या‍यालयीन निकालाचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.  

       "महसूल प्रश्नो्त्तरे" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. "महसूल प्रश्नोत्तरे" मध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक तेथे अद्ययावत तरतुदींचा संदर्भ घ्यावा ही विनंती.

हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा