Thursday 28 July 2016

शासकीय जमीन मागणी -डॉ.संजय कुंडेटकर सर

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण तीन तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम 1971 मधील तरतुदी नुसार विविध कारणासाठी शासकीय जमीन प्रदान केली जाते.या जमिनीचे वाटप कसे करतात याबाबत अनेकदा विचारणा होत असते याबाबत संपूर्ण माहिती देणारा लेख मा.डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी लिहिला आहे. हा लेख वाचून आपल्या शासकीय जमीन मागणी बाबत असणाऱ्या सर्व शंकांचे समाधान होईल यात शंका नाही.

हा लेख pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
शासकीय जमीन मागणी

Sunday 24 July 2016

महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 चे शर्तीस अधीन असलेल्या जमिनीचे सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय झालेले हस्तांतरण नियामाकुल करणे

         महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 चे शर्तीस अधीन असलेल्या जमिनीचे सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय झालेले हस्तांतरण नियामाकुल करणेबाबत कलम 84 (क ) मध्ये पूर्वी तरतूद नव्हती.
   


       सन 2016 चा अधिनियम 20 दि. 7 मे 2016 अन्वये अशी हस्तांतरणे नियामाकुल करणेबाबत ची तरतूद अधिनियमात करणेत आलेली आहे.त्यानुसार खालील बाबींची पूर्तता होत असलेस हस्तांतरण नियामाकुल होणार आहे.

1.कुळकायदा कलम 43 शर्तीस अधीन असलेल्या जमिनीचे सक्षम अधिकाऱ्याच्या परवनगीशिवाय हस्तांतरण झालेले प्रकरणी कलम 84 क अन्वये आदेश तहसिलदार यांनी दि.7/05/2016 पूर्वी पारित केलेले नसावेत.

2.जमीन खरेदी केलेली व्यक्ती (कुळ नसलेली) सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खरेदी केलेल्या जमिनीचे अनुषंगाने चालू बाजारभावाच्या 50 % रक्कम (शेती प्रयोजन वापर होणार असेल तर ) अथवा 75% (जमिनीचा वापर शेतीव्यतिरिक्त होत असेल तर ) रक्कम सरकार जमा करील.
   

       वरील बाबींची पूर्तता झालेस हस्तांतरण नियामाकुल होणार आहेत.तरी कुळकायदा 43 शर्तीस असलेली जमीन सक्षम अधिकाऱ्याचे पूर्व परवानगीशिवाय खरेदी केलेली असलेस सदर व्यवहार नियमाकुल करणेसाठी तहसिल कार्यालय यांचेकडे प्रस्ताव सादर करावा.


सन 2016 चा अधिनियम 20 दि. 7 मे 2016 प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 


Saturday 23 July 2016

राजपत्रित अधिकारी दैनंदिनी व हस्तपुस्तिका-2016

शासकीय कामकाज करत असताना अत्यंत उपयोगी असणारी दैनंदिनी व कार्यालय प्रमुख यांची हस्तपुस्तिका आज mohsin7-12.blogspot.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करत आहोत.राजपत्रित अधिकारी तसेच कर्मचारी यांना माहितीसाठी अंत्यंत उपयोगी अशी दैनंदिनी व हस्तपुस्तिका आहे.उपयोगी कायदे ,सेवा शर्ती ,तसेच  कामकाज विषयी आवश्यक असणारे कायदेशीर  बाबी यात समाविष्ट केलेल्या आहेत.आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना या दैनंदिनी व हस्तपुस्तीकेचा नक्कीच सर्वाना उपयोग होईल.ही दैनंदिनी व हस्तपुस्तिका श्री.अण्णाराव भुसणे ,अप्पर कोषागार अधिकारी तथा  सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ लातूर जिल्हा समन्वय समिती यानी मला प्रकाशित करणेसाठी उपलब्ध करून दिली आहे त्यांचे हार्दिक आभार .

खालील लिंक वर क्लिक करून  pdf स्वरुपात दैनंदिनी व हस्तपुस्तिका प्राप्त करा 

Friday 15 July 2016

जाणून घ्या महसूल सलंग्न कायदे..

                               



                      महसूल खाते हे सर्व खातेमधील प्रधान खाते समजले जाते कारण इतर खातेवर अप्रत्यक्ष नियंत्रण व प्रशासन महसूल खात्याचे असते.महसूलमध्ये कामकाज करत असताना अधिकारी यांना दंडाधिकारी म्हणून कामकाज करावे लागते अशा परिस्थितीमध्ये केवळ महसूल खातेमधील कायदेच नव्हे तर इतर अनेक कायद्यांचा अभ्यास अधिकारी व कर्मचारी यांना प्रभावी कामकाज करणेसाठी करावा लागतो.कायद्यांचा अभ्यास असेल तर कोणतेही काम अचूक व कमी वेळेत होते.महसूल मधील कामकाज पाहता अनेकवेळा संपूर्ण कायदे वाचन करणे शक्य होत नाही परंतु कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहिती असलेस अडचण येत नाही.
                या सर्व बाबींचा विचार करून महसूल मधील अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांस आवश्यक अशा 18 कायद्यांची माहिती देणारी ही पुस्तिका सादर करत आहोत.या पुस्तिकेमध्ये 18 कायदे व त्यातील महत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत.सोप्या व सरळ भाषेत तरतुदी दिलेल्या असलेने मूळ कायदा समजणेस अडचण येणार नाही.कायद्यातील मूळ तरतुदी पाहून थोडक्यात या तरतुदी तयार केल्या आहेत तरी काही समस्या असलेस मूळ कायदेशीर संदर्भ व कायद्याचा आधार घ्यावा.
            महसूल मधील अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य जनतेस या पुस्तिकेचा नक्कीच उपयोग होईल अशी मला आशा आहे.तसेच या पुस्तकाची सुधारित आवृत्ती करणार असून बरेच कायदे यामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत.सदर पुस्तिका तयार करणेसाठी आमचे मित्र श्री.विनायक विष्णू यादव,मंडळअधिकारी वाळवा,जि.सांगली यांनी बहुमोलाचे सहकार्य केले आहे व पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे त्यांचे हार्दिक आभार...

ही पुस्तिका खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करून घ्यावी 


Tuesday 5 July 2016

गोपनीय अहवाल -डॉ.संजय कुंडेटकर ,उपजिल्हाधिकारी, सातारा

अधिकारी व कर्मचारी यांचे वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन करणेचे एकमेव साधन म्हणजे गोपनीय अहवाल.गोपनीय अहवाल हा अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी अत्यावश्यक भाग याविषयी थोडक्यात माहिती देणारा लेख लिहावा अशी विनंती डॉ.संजय कुंडेटकर सर यांना केलेनंतर सरांनी वेळात वेळ काढून अधिकारी व कर्मचारी यांना माहितीपर असा गोपनीय अहवाल बाबत लेख लिहिला आहे.श्रीम.कविता देशमुख,परिविक्षाधीन नायब तहसिलदार यांनी गोपनीय अहवालबाबत असणारे महत्वाचे शासन निर्णय पुरविले आहेत. या सर्वांचे संकलन करून गोपनीय अहवाल विषयी एक pdf तयार केली असून त्यामध्ये खालील बाबी आहेत 
  • गोपनीय अहवाल मुलभूत माहिती 
  • गोपनीय अहवालांचे संस्करण करणे 
  • प्रतिकूल शेरे कळविणे व त्यावरील अभिवेद्नावर कार्यवाही करणे 
  • प्रतिकूल शेऱ्याविरुद्ध दुसऱ्याच्या अभिवेद्नावर कार्यवाही करणे 
  • गोपनीय अहवाल बाबत असणारे शासन निर्णय 
गोपनीय अहवाल pdf प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

लेख:-डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी ,सातारा 
संकलन :- श्री.मोहसिन युसुफ शेख 
तलाठी -कर्जत जि.अहमदनगर 
mohsin7-12.blogspot.in
mohsin7128a@gmail.com
9766366363

Monday 4 July 2016

ALIENATION MANUAL





R.N.Joglekar Alienation Manual   (English version) 

(Containing information about all kinds of Inam and Watans)

Published By government
01/02/1921✍🏻

Re Published on 

( With Recent GR's & CR's)

On 

mohsin7-12.blogspot.in

Today 

04/07/2016

महसूल खात्यामध्ये अनेकदा काम करताना अनेक निर्णय घ्यावे लागतात अशावेळी कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करावा लागतो.महसूल मध्ये अनेक प्रकरणात जुन्या साहित्याचा संदर्भ म्हणून वापर करावा लागतो किंवा जुन्या साहित्यातील तरतुदी पाहून निर्णय द्यावे लागतात.महसूल मध्ये इनाम व वतन जमीन बाबत जाणून घेणेची अनेकांची उत्सुकता असते परंतु याबाबत जुने साहित्य सहजासहजी मिळत नाही.तसेच आज रोजी दुर्मिळ साहित्य ही सहजासहजी उपलब्ध होत नाही.
             हल्ली महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिकेचे खंड १ ते ४ बाजारात विविध प्रकाशनामार्फ़त विक्रिसाठी संकलीत शासन संदर्भ म्हणून उपलब्ध् आहेत. महसुल व्यवस्थेमधे सर्वांना जुने संदर्भ व कार्यपध्द्ती माहित असणे अनिवार्य आहे. मात्र जुन्या संदर्भ पुस्तकांच्या अनुपल्ब्ध्तेमुळे, वाचनाची आवड कमी झाल्यामुळे तसेच या बाबींचा प्रशिक्षणामधे समावेश केला गेला नसल्याने अशा म्हत्वाच्यान संदर्भांकडे दुर्लक्ष होत आहे. 
     “Alienation Manual “ हे रावबहाद्दूर आर.एन जोगळेकर सर तत्कालीन Asst.Alienation commissioner ,central Divison  यांनी केंद्र सरकारचे आदेशावरून  इनाम व वतन जमीन बाबत सर्व प्रकारची माहिती देणारे पुस्तक त्यांचे अनुभवातून तयार केले व दि.1 फेब्रुवारी 1921 रोजी सरकारने प्रकाशित केले.या पुस्तकात इनाम व वतन जमिनींबाबत माहिती इंग्लिश मध्ये दिलेली असून आज रोजी दुर्मिळ साहित्य म्हणून या पुस्तकाचे वाचन करणेस अडचण नाही. “ तसेच महाराष्ट्र शासनाने इनाम व वतन जमीन बाबत घेतलेले 10 शासन निर्णय शेवटी समाविष्ट करणेत आलेले आहेत यामुळे सध्याची या इनाम व वतन जमीन बाबत कायदेशीर माहिती मिळणेस मदत होणार आहे “ हा जुना दुर्मीळ असा सर्वांना उपयुक्त संदर्भ संकलित करुन महसूल अधिकारी व इतर वाचकाच्या माहितीसाठी महसूल मित्र मोहसिन शेख ( (mohsin7-12.blogspot.in )  या ब्लॉगस्पॉट वर प्रकाशित केला आहे.
पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ..


⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
Mohsin shaikh
Talathi-karjat
mohsin7128a@gmail.com
mohsin7-12.blogspot.in
9766366363
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴⁠⁠⁠⁠