Wednesday 27 April 2016

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५५ व २५७ सुधारणा

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५५ व २५७ मध्ये  सुधारणा करणेत आलेली असून याबाबत  ११ एप्रिल २०१६ रोजी राजपत्र प्रसिध्द करणेत आलेले आहे.या सुधारणेनुसार आता अपिल व रिव्हिजन यासंबंधी कलमांची  सुधारणा करणेत आली आहे.याबाबतचे  राजपत्र पाह्नेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

म.ज.म.अधिनियम १९६६ कलम २५५ व २५७ सुधारणा

"ई-बुक " उपक्रमातील पहिले बुक

आपल्या ब्लॉग / संकेत स्थळावरील माहितीचा अनेक  मित्रांना उपयोग होत असून ब्लॉग वर नेहमी काही तरी नवीन करणेची प्रेरणा त्यांची  प्रतिक्रिया वाचून मिळते.अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम आजपासून महसूल मित्र मोहसिन (mohsin7-12.blogspot.in ) या संकेतस्थळावर चालू करणेत येत आहे.बाजारात अनेक पुस्तके मिळतात पण सध्याचे युग हे संगणक युग असलेने पुस्तके ही संगणकात साठवलेली  असावी असे अनेकांना वाटते त्यातून "ई -बुक" संकल्पना अस्तित्वात आली.ई -बुक नावाचे एक पेज या संकेतस्थळावर चालू करणेत येत असून यामध्ये अनेक तज्ञ व अभ्यासु अधिकारी/कर्मचारी  यांचे पुस्तके यापुढे ई-बुक स्वरुपात प्रकाशित करणार आहोत.या पुस्तकाची आपण प्रिंट काढू शकता व बांधणी करून संकलन म्हणून वापरू शकता तसेच मोबईल व संगणक यामध्ये ही कायमस्वरूपी साठवून ठेऊ शकता.आज या उपक्रमातील पहिले ई-बुक प्रकाशित करत आहोत सदर बुक हे मा.शशिकांत जाधव सर व मी संकलित केलेले आहे. मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी या पुस्तकास प्रस्तावना दिली आहे तालुकास्तरावरील  समित्यांची रचना व कार्ये याबाबत माहिती व शासन निर्णय असणारी ही १६५ पानांची पुस्तिका आपणास नक्की उपयोगी ठरेल ही आशा आहे .
 पुस्तिका प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा

तालुकास्तरावरील समित्या रचना व कार्ये - ई -बुक

Sunday 17 April 2016

चारा छावणी -डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा

आपला भारत देश  हा कृषिप्रधान देश असून आपल्या देशात कृषिबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन हा जोडधंदा करणेत येतो किंबहुना हा शेतकरी यांचेसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे.महाराष्ट्र मध्ये देखील पशुपालन हा जोडधंदा सर्रास केला जातो.शेतीचे उत्पन्न हे अनिश्चित असलेने पशुपालानास अनन्यसाधारण महत्व आहे.मुख्यत दुग्ध उत्पादन व शती मशागती साठी जनावरांचा वापर केला जातो.सध्या  राज्यात वारंवार दुष्काळ पडल्यामुळे पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाई ही देखील मोठी समस्या बनली आहे.चारा टंचाई मुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे बाजारात विकण्याशिवाय पर्याय राहत नाही.अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या चारा छावण्या एक प्रकारे शेतकऱ्यांना वरदानच ठरतात.अशा चारा छावणी बाबत माहिती देणारी छोटी पुस्तिका डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार केली असून ही पुस्तिका शेतकरी.छावणी चालक संस्था,अधिकारी यांना खूप उपयोगी आहे.या पुस्तिकेमध्ये प्रामुख्याने खालील विषय आहेत.
  • छावणीसाठी कायदेशीर तरतूद 
  • छावणीसाठी मान्यता प्राप्त संस्था 
  • छावणी चालक यांनी करावायचे अर्ज व संबंधित कार्यपद्धती व करार 
  • छावणी मधील पूर्ण व्यवस्था व छावणी रचना 
  • छावणीसाठी आवश्यक नोंदवह्या व रजिस्टरचे नमुने 
  • अधिकारी यांना नवीन छावणी साठी करावयाचा आदेश नमुना 
  • छावणी तपासणी अधिकारी यांना तपासणी नमुना 
तसेच इतर छावणी संबंधी सर्व प्रकारची माहिती प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 




लेख-डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
संकलन-श्री.मोहसिन शेख ,तलाठी-कर्जत ,अ.नगर 
Email:-mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
contact:-9766366363

Saturday 16 April 2016

रजा नियम तक्ता -डॉ.संजय कुंडेटकर सर

शासकीय अधिकारी /कर्मचारी यांना  राजपत्रात जाहीर केलेल्या सुट्ट्या व सण वगळून महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ नुसार खातेप्रमुख यांचेकडे अर्ज करावा लागतो. परंतु बरेच जणांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ नुसार कोणत्या रजा असतात ? त्या किती दिवस असतात ? व त्याबाबत इतर माहिती काय आहे ? असे प्रश्न मनात असतात व प्रत्येक वेळी पुस्तक घेऊन शोधावे लागते.डॉ.संजय कुंडेटकर सर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ नुसार रजांची माहिती देणारा लेख व तक्ता तयार केला आहे .हा ३ पानाचा लेख व तक्ता आपण पाहिलेस प्रत्येक वेळी पूर्ण पुस्तक पाहणेची आवश्यकता राहणार नाही.
हा लेख व तक्ता प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 



लेख-डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
संकलन-श्री.मोहसिन शेख ,तलाठी-कर्जत ,अ.नगर 
Email:-mohsin7-128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
contact:-9766366363



Thursday 14 April 2016

आई वडिलांचा व जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 -डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा

आई वडिलांचा व जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 तसा हा कायदा बरेच प्रमाणत दुर्लक्षित राहिलेला आहे.आई  वडील तसेच ज्येष्ठ नागरिक यांचे निर्वाह व कल्याण साठी हा कायदा करणेत आला आहे.या कायद्याविषयी उत्कृष्ट माहिती डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार केली आहे.हा कायदा ज्येष्ठ नागरिक ,सर्व निर्वाह अधिकारी,सर्व उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व महसुल व समाजकल्याण विभागातील सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कायद्याविषयी असणाऱ्या सर्व संकल्पना अधिक स्पष्ट होणेस हा लेख उपयुक्त आहे.यामध्ये प्रामुख्याने खालील बाबी आहेत. 


  • कायद्यातील मुख्य तरतुदी 
  • कायद्याविषयी न्यायनिर्णय 
  • अर्जाचे प्रारूप नमुने
  • न्यायधिकरण  यांचेसाठी  महत्वाचे नमुने (समझोता करार ,नोटीस, इ)
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

लेख-डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा 
संकलन-श्री.मोहसिन शेख ,तलाठी-कर्जत ,अ.नगर 
Email:-mohsin7-128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in
contact:-9766366363

Wednesday 13 April 2016

वारस कायद्यातील तरतुदी -डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी

वारस कायदा हा किचकट असलेमुळे  अनेकांना पुस्तकात वाचून देखील लक्षात येत नाही.हिंदू वारस कायदा १९५६ ,त्यातील २००५ ची  सुधारणा ,भारतीय वारसा कायदा यातील महत्वाच्या तरतुदी तसेच काही महत्वाचे न्यायलयीन निर्णय याचा मेळ करून उत्कृष्ट असा लेख डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी लिहिला असून हा लेख वाचून आपले खालील संकल्पना स्पष्ट होतील.


  • हिंदू वारस कायदा कोणाला लागू होतो ?
  • हिंदू वारस कायद्यातील काही महत्वाचे शब्दार्थ
  • नवीन सुधारणा प्रमाणे वारसांचे वर्ग व संपत्ती वितरण 
  • विनामृत्युपत्र मयत हिंदू स्त्री चे वारस 
  • गर्भस्त अपत्य 
  • हिस्सा मिळण्यास अपात्र वारस 
  • स्वतंत्र मिळकती 
  • महत्वाचे न्याय निर्णय 
  • भारतीय वारसा कायदा व त्यामधील महत्वाचे तरतुदी 
  •  एकत्र हिंदू कुटुंबातील मिळकतीचे वाटप, वाटपाचे प्रकार,वाटपाचा दावा
  • वाटप दावा लावणेचे हक्कदार 
  • एकत्र कुटुंब कर्त्याने कुटुंबाची मिळकत विकणे 
  • वडिलांचा विशेषाधिकार 
हा लेख pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
वारस कायद्यातील तरतुदी-डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी

Saturday 2 April 2016

ओळखपरेड कार्यपद्धती-मा.बबन काकडे सर ,तहसिलदार

ओळखपरेड मुख्यत्वे फौजदारी प्रकरणातच घेतली जाते,त्यामुळे ओळखपरेड घेणाऱ्या कार्यकारी दंडाधिकारी यांना साक्षीसाठी हमखास न्यायालयात जावे लागते.त्यामुळे ओळखपरेड घेणाऱ्या दंडाधिकारी यांना यातील बारीकसारीक माहिती तपशिलासह माहित असणे आवश्यक असते.ओळखपरेड तसेच साक्षीस जाणेपूर्वी यातील तरतुदी बारकाईने अभ्यासल्यास प्रक्रिया अचूक पार पाडणे व तांत्रिक चुका टाळणे शक्य होते.न्यायालयामध्ये कार्यकारी दंडाधिकारी / तहसिलदार यांना ओळखपरेड घेणेचा अधिकार आहे का ?किंवा तशी तरतूद कोठे आहे? हा प्रश्न हमखास विचारला जातो त्यासाठी ओळखपरेड विषयी सर्वोत्परी माहिती मा.बबन काकडे सर यांनी ppt माध्यमातून दिली आहे.यामध्ये खालील बाबी आहेत.

  1. ओळखपरेड कायदेशीर तरतूद व त्यांचा तपशील 
  2. ओळखपरेड मुख्य हेतू 
  3. ओळखपरेड घेणेची कार्यपद्धती 
  4. पोलीस विभागाकडून ओळखपरेड चे पत्र प्राप्त होताच काय करावे ?
  5. ओळखपरेड साठी पंच म्हणून सरकारी पंच का घ्यावेत ?
  6. कार्यकारी दंडाधिकारी यांचा कार्यवृत्तांत व नमुने 
  7. ओळखपरेड कालावधीतील कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालयीन पत्र नमुने 
ही सर्व माहिती प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
 ओळखपरेड-मा.बबन काकडे सर