Wednesday 23 December 2015

महसूल मधील चौकशी व पंचनामे

महसूल मध्ये कामकाज करत असताना अनेक वेळा  विविध प्रकारच्या चौकश्या व पंचनामे करावे लागतात.सदर चौकशी कोणत्या प्रकारची आहे ? याची आपणास माहिती असलेस काम करताना त्रास होत नाही तसेच विविध पंचनामे करताना ते वस्तुनिष्ट केलेस पुढील कार्यवाही करणे सोपे जाते.त्यामुळे महसूल मधील मार्फत होणारे विविध चौकशी व पंचनामे याबाबत नाशिक प्रशिक्षण प्रबोधिनी यांनी एक ppt तयार केली आहे त्या ppt चे pdf रूपांतरण केले आहे.या pdf मध्ये खालील बाबी स्पष्ट केलेल्या आहेत
  • महसूल मधील चौकशी व त्यांचे प्रकार उदाहरणासहीत 
  • वहिवाट दावा 
  • रस्ता केस 
  • पिक पाहणी केस 
  • महसूल प्रशासनात पंचनामा करणेची कारणे व प्रसंग 
  • आदर्श पंचनामेसाठी महत्वाच्या बाबी 
  • पंचनामा लिहिताना अवलंब करावयाची सर्वसाधारण पद्धत 
  • पिकपाहणी केस मधील पंचनामा ,रस्ता केस वहिवाट केस पंचनामा ,
  • नैसर्गिक आपत्ती 
इ सर्व बाबी pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा

Saturday 19 December 2015

तलाठी मार्गदर्शिका

मागील पोस्ट मधे आपण महसूल अधिकारी व् कर्मचारी मार्गदर्शिका वाचून भरघोस  प्रतिसाद दिला व् अनेक महसूल खातेतील मित्रानी तलाठी मार्गदर्शक साठी विनंती केलि होती या विनंती ला मान देऊन श्री.दुगमवार तलाठी देगलुर जि. नांदेड यानी तलाठी मार्गदर्शिका  मला उपलब्ध करून  दिली आहे.या कामाबद्दल त्यांचे सर्व तलाठी मित्रांतर्फे अभिनंदन ......

तलाठी याना मुलभुत प्रशिक्षण बरोबरच उपयुक्त असे संदर्भ साहित्य उपलब्ध झालेस त्याना अडचणी येणार नाहीत तसेच प्रशासन गतिमान होइल या भावनेतुन नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्रीकर परदेशी सर यांनी तलाठ्याना कार्यक्षम व कायद्यानुसार कामे करण्यासाठी म्हणुन त्यांनी त्यावेळच्या त्यांचे अधिनस्त उपजिल्हाधिकारी व ईतर अधिकारी यांना तलाठी कामकाजासंबधित विषय नेमुन कायद्याच्या प्रचलीत बाबी वर नोटस तयार केले.व त्याची पुस्तक स्वरुपात मांडणी करुन वितरीत केली.
सदर पुस्तकाची PDF प्रत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

संकलन- श्री दुगमवार तलाठी देगलुर जि. नांदेड

Saturday 12 December 2015

महसूल अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शिका


महसूल कर्मचारी व अधिकारी यांना महसूल खातेमध्ये कामकाज करणेसाठी आवश्यक मार्गदर्शिका तत्कालीन नांदेड जिल्हाधिकारी मा.श्री.श्रीकर परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड मधील अधिकाऱ्यांतर्फे अतिशय मेहनत घेऊन  तयार करणेत आलेली आहे.सदर मार्गदर्शिका नांदेड जिल्ह्यातील नवीन महसूल अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी तत्कालीन नांदेड जिल्हाधिकारी मा.श्री.श्रीकर परदेशी यांनी वितरीत केली असून अत्यंत सुंदर अशी ही  मार्गदर्शिका असून याचा नवीन अधिकारी व कर्मचारी यांना नक्कीच लाभ होईल.सदर मार्गदर्शिका प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा


Thursday 10 December 2015

संकीर्ण महसुली कामकाज

संकीर्ण महसुली कामकाज बाबत मा.श्री।बबनराव काकडे सर यांनी  खालील बाबी असणारी  ppt तयार केली आहे सदर ppt ही pdf मध्ये रुपांतरीत केली आहे.
  • निवडणूक विषयक कार्ये 
  • ग्रामपंचायत निवडणूक विषयक कार्ये 
  • विविध संजय गांधी विभाग योजना 
  • गौणखनिज विषयक कार्ये 
  • पुरवठा विषयक कार्ये 
  • पाणी टंचाई 
  • रोजगार  हमी योजना
  • जणगणना 
  • कृषी गणना 
  • इतर आवश्यक कार्ये 
  • मामलेदार कोर्ट अधिनियम मधील महत्वाची कलमे 
हे सर्व pdf स्वरुपात  वाचणेसाठी येथे क्लिक करा 

 

Sunday 6 December 2015

गौणखनिज तपासणी अहवाल व नमुने

महसूल मधील कामकाज करताना अनेक वेळा पंचनामा ,जबाब,अहवाल याप्रकारची कामे करावी लागतात.यामधील एक महत्वाचा भाग म्हणजे गौणखनिज वाहतूक तपासणी करणे.अनेक वेळा आपलेला अशा अनधिकृत वाहतुकीचा पंचनामा करावा लागतो असा पंचनामा करताना तो योग्य , वस्तुनिष्ठ स्पष्ट माहीती देणारा असलेस भविष्यात अडचण येत नाही.तसेच जबाब ,आदेश ,अहवाल यासारखी कामे करावी लागतात.या सर्व बाबी एकाच pdf मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.यामध्ये खालील बाबी आहेत.

  • अनाधिकृत गौणखनिज वाहतूक/उत्खनन जबाब
  • अनधिकृत गौणखनिज वाहतूक पंचनामा
  • अनाधिकृत गौणखनिज उत्खनन / वाहतूक आदेश 
  • खाण तपासणी नमुना
  • उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना द्यावयाचे पत्र नमुना
  • वीटभट्टी तपासणी नमुना

  टीप :- सदरचे नमुने हस्तलिखित व टंकलिखित करणेत यावेत गाळलेल्या जागा भरू नये 
 
नमुने प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा 
 

Saturday 5 December 2015

नगर तालुका तलाठी संघटना जिल्हा अहमदनगर यांचा अभिनव उपक्रम- ७-१२ दिन

   तलाठी संवर्ग हा नेहमी कामात व्यस्त असतो अशावेळी तलाठी संवर्गास अनेक योजना अनेक नवनवीन शासन उपक्रम राबवणे यामध्ये तलाठी संवर्गास स्वतः साठी काही तरी करणेसाठी वेळ मिळत नाही.  या सर्व बाबी लक्षात घेता तलाठी संवर्गासाठी ही एखादा विशेष दिवस असावा अशी संकल्पना नगर तालुका तलाठी संघटना जिल्हा अहमदनगर यांना सुचली आणि त्यांनी नगर तालुका तर्फे ७/१२/२०१५ म्हणजे ७-१२ या तारखेला ७-१२ दिन हा तलाठी दिन कार्यशाळा व स्नेह मेळावा या स्वरुपात  साजरा करणेचा निर्णय घेतला.या कार्यक्रमात मा.जिल्हाधिकारी अहमदनगर श्री.कवडे सर स्वतः अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच इतर मान्यवर अधिकारी तलाठी संवर्गास मार्गदर्शन करणार आहेत.तलाठी दिवस म्हणून  जिल्ह्यातील सर्व तलाठी बांधवानी या कार्यक्रमास हजर राहावे असे आवाहन श्री.गणेश जाधव ,अध्यक्ष नगर तालुका तलाठी संघटना यांनी केले आहे.तरी सर्वांनी खालील निमंत्रण पत्रिका हे निमंत्रण समजून उपस्थित राहावे ही  नम्र विनंती.

 दिनांक :- सोमवार दिनांक ७/१२/२०१५ रोजी
स्थळ व वेळ :- माऊली संकुल सभागृह ,सावेडी अहमदनगर सकाळी ८.४५

 आपला ,
 मोहसिन शेख,अध्यक्ष, कर्जत तालुका तलाठी संघटना