Thursday 24 September 2015

जमीन महसूल साक्षरता अभियान -मा.श्री.गणेश मिसाळ सर


 जमीन महसूल साक्षरता अभियान 

 मा.शेखर गायकवाड, भा.प्र.से, सध्या जिल्हाधिकारी सांगली यांच्या खास शेतकऱ्यांसाठी व सामान्य माणसाला समजेल अशा लिहीलेल्या गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती पुस्तकातील काही गोष्टी (25 गोष्टी ) फ्रेम करून प्रांताधिकारी, पाचोरा ,तहसील पाचोरा व भडगाव या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.(एकूण 75 फ्रेम ).


" या फ्रेम चे मा.जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याबाबत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत....यामुळे निश्चितपणे शेतकरी बांधव यांना जमीन विषयक कायदे व नियम याची माहिती होऊन जमीनीच्या व्यवहारात त्यांची फसवणूक होणार नाही "
....गणेश मिसाळ, प्रांताधिकारी, पाचोरा


 























ब्लॉग वरील   जमीन महसूल साक्षरता अभियान या लिंक वर क्लिक केलस आपण फेसबुक वरील या पेज वर वरील  बाबी गोष्टीरूप तसेच व्हिडीओ स्वरुपात पाहू शकाल










Tuesday 22 September 2015

ए.कु.क कमी करणेची सविस्तर कार्यपद्धती -मा.श्री गणेश मिसाळ सर

ए.कु.क कमी करणेची सविस्तर कार्यपद्धती:- 
  1. ए.कु.क कमी करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी कार्यालय पाचोरा यांचे परिपत्रक दि १९/०९/२०१५ 
  2. ए.कु.क कमी करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी यांची प्रेसनोट
  3. ए.कु.क कमी करून सर्व वारस दाखल करणेबाबत तलाठी यांचे साठी फेरफार नमुना 
  4. या मोहीम अंतर्गत तलाठी यांनी घेतलेले फेरफार
pdf स्वरुपात प्राप्त करणेसाठी येथे क्लिक करा


पाचोरा उपविभागाची विशेष मोहीम :- मा.श्री.गणेश मिसाळ सर

महाराजस्व अभियान अंतर्गत पाचोरा उपविभागाची विशेष मोहीम

ए.कु.क ची नोंद कमी करून सर्व वारसांची नावे ७/१२  वर लावणेबाबत विशेष मोहीम मा.श्री.गणेश मिसाळ सर ,उपविभागीय अधिकारी पाचोरा उप विभाग यांनी त्यांचे उपविभागाकरिता सुरु केली आहे.सदर मोहीम मा.महसूल मंत्री एकनाथ खडसे साहेब व जिल्हाधिकारी मा.रुबल अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली सुरु करणेत आली आहे.सदर मोहीम सर्व उपविभागात लवकरच राबवली जाईल याबाबत शंका नाही...ही विशेष मोहीम केलेबद्दल पाचोरा उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन ....
सदर मोहीम बाबत पाचोरा उपविभागातील सर्व शेतकरी बांधवाना आव्हान मा.श्री.मिसाळ सर यांनी केले आहेया योजनेचे थोडक्यात स्वरूप व कार्यपद्धती पाहणेसाठी येथे क्लिक करा

Friday 18 September 2015

फौजदारी संहिता प्रकिया १९७३ कलम १०७ ,१०८.१०९ व ११० अंतर्गत कार्यवाही

फौजदारी संहिता प्रकिया १९७३ कलम १०७ ,१०८.१०९ व ११० अंतर्गत कार्यवाही.
कार्यकारी दंडाधिकारी यांनी फौजदारी संहिता १९७३ कलम १०७ ,१०८,१०९, व ११० मध्ये कशी कार्यवाही करावी तसेच संहितेत या संबंधित असणारे इतर कलम बाबत  सविस्तर महिती देणारा वाचणेसाठी येथे क्लिक करा 


लेख :- मा.श्री.व्ही.आर.थोरवे ,ना.तहसिलदार ,जिल्हा :- भंडारा

Tuesday 15 September 2015

विभागीय दुय्यम सेवा (तलाठी संवर्ग)

 विभागीय दुय्यम सेवा तलाठी संवर्ग 
  1. परीक्षा उत्तीर्ण होणेची आवश्यकता 
  2. परीक्षा उत्तीर्ण होणेची संधी व कालावधी 
  3. परीक्षा उत्तीर्ण न झालेस होणारे परिणाम 
  4. परीक्षेला बसणेकरीता संधी 
  5. सुट 
  6. परीक्षा केव्हा घेण्यात येते 
  7. परीक्षेला बसणेसाठी अर्जाचा नमुना 
  8. परीक्षा पाठ्यक्रम 
या सर्वांची माहिती घेणेसाठी    येथे क्लिक करा

Wednesday 9 September 2015

गाव नमुने - प्रशिक्षण

महसूल खातेमध्ये नव्याने रुजू झालेले तलाठी तसेच गाव नमुने ,खंड चार मधील संकल्पना समजून घेणेस उत्सुक असलेले कर्मचारी यांना पायाभूत प्रशिक्षण  म्हणून उपविभागीय अधिकारी  कार्यालय देगलूर व तहसील कार्यालय देगलूर जि.नांदेड यांनी ९१ पानांची सुंदर तयार केलेले ppt  चे pdf मध्ये रुपांतर केलेले आहे.सदर माहिती श्री जोशी सर व चव्हाण सर हे तलाठी संवर्गातून पदोन्नत अधिकारी यांनी तयार केलेमुळे  तलाठी यांचेसाठी आवश्यक बाबी त्यांनी नमूद केलेले आहेत.सदर pdf चे वाचन करून सर्वाना  अवश्य लाभ होईल ही अपेक्षा आहे.
 pdf वाचणेसाठी  क्लिक करा 

मार्गदर्शक :- मा.श्री.रवींद्र बिनवडे (IAS) ,उपविभागीय अधिकारी देगलूर जि.नांदेड

संकलन :-  मा.श्री.वासुदेव जोशी सर ,ना.तहसिलदार देगलूर जि.नांदेड
                 मा.श्री.आ.र.जी चव्हाण  सर ,ना.तहसिलदार देगलूर जि.नांदेड

ब्लॉग ला ppt सहकार्य :- श्री दुगमवार व्यंकटरमण लक्ष्मणराव ,तलाठी देगलूर जि.नांदेड

Monday 7 September 2015

अनधिकृत गौणखनिज वर करावयाची फौजदारी कारवाई

अनधिकृत गौणखनिज वर करावयाची फौजदारी कारवाई 
  • भारतीय दंड संहिते खाली कोणत्या कलमानुसार कारवाई करावी ?
  • पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कारवाई
  • खाण व खनिज अधिनियम १९७५ नुसार  कारवाई 
  • सक्षम प्राधिकारी किंवा फौजदारी कोण दाखल करू  शकते ?
  • मा.सर्वोच्च न्यायालय यांनी पोलीस प्रशासन व न्यायालय यांना दिलेली सूचना 
सर्व माहिती श्री.शशिकांत जाधव ,ना.तहसीलदार  सावंतवाडी यांनी संकलित केली आहे.pdf  वाचणेसाठी
click here

Saturday 5 September 2015

बिनशेती आदेश पारित झालेनंतर ७/१२ उतारा तयार करणेची कार्यपद्धती

बिनशेती आदेश पारित झालेनंतर फेरफार नोंद कशी करावी ? ७/१२ उता-यावर कसा अंमल घ्यावा? तसेच AMNITY SPACE ,OPEN SPACE यांची नोंद कशी करावी ?याबाबत तलाठी यांना वारंवार अडचणी येतात.या सर्व बाबींवर तलाठी यांना मार्गदर्शक सूचना देणारे परिपत्रक ,उपविभागीय अधिकारी कार्यालय ,भाग-श्रीरामपूर ,जि.अहमदनगर यांनी त्यांचे उपविभागातील  तलाठी यांचेसाठी काढले आहे.या परिपत्रकातील बाबींचा प्रत्येक तलाठी यांनी मार्गदर्शक सूचना म्हणून वापर केलेस बिगरशेती आदेशाची नोंद करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही .

परिपत्रक डाऊनलोड करणेसाठी  download here