Sunday 30 August 2015

कुळ व कुळाची संकल्पना

कुळ व कुळाची संकल्पना नेमकी काय?  याबाबत   लवकर माहिती मिळत नाही व उपलब्ध पुस्तकातील  कायद्याची भाषा लवकर समजत नसलेने अडचण निर्माण होते .याबाबत मा.श्री.शेखर गायकवाड (I.A.S)  यांचा  सोप्या भाषेत  माहिती  देणारा हा एक लेख आहे. या लेखामध्ये आपले खालील संकल्पना बरेच प्रमाणात स्पष्ट होतील.तसेच कुळ  वहिवाट सुधारणा २००६ बाबत एक शासन परिपत्रक जोडले आहे त्याचाही अभ्यास करावा.  
  • कुळ म्हणजे काय ?
  • संरक्षित कुळ म्हणजे काय ?
  • कायम कुळ म्हणजे काय ?
  • कुळ हक्क निर्माण कसा होतो ?
  • कुळ हक्क कोणाच्या जमिनीला निर्माण होऊ शकत नाही 
  • जमीन मालकाने स्वत: जमीन कसणे म्हणजे काय ?
  • कुळ कायदा कलम ४३ च्या अटी
  • नव्याने कुळहक्क निर्माण होतो का ?
  • मुंबई कुळ वहिवाट कायदा कलम ४ मधील सुधारणा परिपत्रक १२ मे २००६ माहितीसाठी
माहिती pdf वाचणेसाठी येथे क्लिक करा

 लेखक :-मा.श्री.शेखर गायकवाड (I.A.S) 

Saturday 29 August 2015

महसूल मार्फत करणेत येणाऱ्या चौकशींचे प्रकार

 महसूल मार्फत करणेत येणाऱ्या विविध प्रकारच्या चौकशी  
  1. चौकशीचे प्रकार कोणते ?
  2. प्रत्येक चौकशी प्रकारात कोणत्या प्रकारे कामकाज करावयाचे ?
  3. कोणत्या प्रकरणासाठी कोणती चौकशी करायची ?
याबाबत pdf माहिती वाचणेसाठी  येथे क्लिक करा

Thursday 27 August 2015

उपजिल्हाधिकारी मा.श्री. राजू नंदकर सर यांचे चारा छावणी पुस्तक

उपजिल्हाधिकारी मा .श्री राजू नंदकर सर  यांनी संकलित केलेले चारा छावणी हे पुस्तक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी , छावणी चालक  तसेच महसूल खातेतील सर्वांसाठी  उपयुक्त आहे.

सदर पुस्तक वाचुन छावणी बाबत असणा-या सर्व  संकल्पना सहज लक्षात येतील तसेच छावणी  चालक ,महसुली अधिकारी व कर्मचारी ,पशुधन अधिकारी  तसेच छावणीचा लाभ घेणारे शेतकरी बंधू या सर्वाना या पुस्तिकेचा नक्कीच उपयोग होईल  हे पुस्तक वाचणेसाठी येथे क्लिक करा

 

Monday 24 August 2015

महसूल मार्फत करणेत येणारी वसुली

महसूल मार्फत करणेत येणारी वसुली लेख क्र.१
  • वसुलीचे अ ब क प्रकार 
  • अ प्रकारात कोणकोणत्या वसुलीचा समावेश होतो ?
  • जमीन महसूल म्हणजे काय ? 
  • खातेदाराचा जमीन महसूल कसा काढतात 
  • वाढीव जमीन महसुल संकल्पना व तो कसा काढतात ?
  • शिक्षणकर म्हणजे काय ? 
  • शिक्षणकरात समावेश होणारी पिके व त्यांचे दर किती असतात ?
  • वाढीव शिक्षणकर कसा आकारावा ?
  • रोजगार हमीकर कसा काढतात  ?
  • या बाबतीतील कायदेशीर तरतुदी कोणत्या ? 
  • या सर्व बाबी pdf स्वरुपात पाहणेसाठी येथे क्लिक करा
लेख :- मोहसिन शेख तलाठी ता. कर्जत जि.अ.नगर

Friday 21 August 2015

श्री.दिनेश नकाते, प्रशिक्षणार्थी नायब तहसिलदार यांची प्रत‍िक्रिया

श्री दिनेश नकाते हे प्रशिक्षणार्थी नायब तहसिलदार  असुन ते अमरावती येथे प्रशिक्षण घेत आहे त्‍यांनी ब्‍लॉग ला भेट दिली व प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.त्‍यांना प्रशिक्षणात ब्‍लॉगला भेट बाबत सांगितले असता ,त्‍यांनी ब्‍लॉग पाहिला व त्‍वरीत मेल केला यातुन त्‍यांची कर्तव्‍य तत्‍परता व जिज्ञासु वृत्‍ती दिसुन येते.  ते नक्‍कीच कर्तव्‍यदक्ष अधिकारी होतील याबाबत शंका नाही .त्‍यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्‍छा


                                                             


Thursday 20 August 2015

विभागीय चौकशी व इतर सेवा विषयक बाबी

मा.श्री.श्रीधर जोशी (Ex-IAS) यांनी विकसित केलेला विभागीय चौकशी ब्‍लॉग अंत्‍यंत उपयोगी असुन त्‍यामध्‍ये  खालील बाबींची सखोल माहिती आहे .

  • विभागीय चौकशी संदर्भात असणारी पुस्‍तके 
  • नियमावली 
  • महत्‍वाचे न्‍यायालयीन संदर्भ व निकाल 
  •  शासन निर्णय 
  • अडअडचणी आलेस संपर्क करण्‍याची सोय 
हा ब्‍लॉग http://departmentalinquirymarathi.blogspot.in/ या लिंक वर उपलबध अाहे.

तसेच महसुल मित्र मोहसिन शेख http://mohsin7-12.blogspot.in या ब्‍लॉगवरील महत्‍वाचे ब्‍लॉग यामध्‍ये जाऊन विभागीय चौकशी यावर  क्लिक केलेस आपणास पाहता येईल. सर्वानी या ब्‍लॉगचा व माहितीचा लाभ घ्‍यावा 

Wednesday 19 August 2015

नैसर्गिक आपत्ती मदत निकष


  • कोणकोणत्‍या आपत्‍ती असतात ?
  • आपत्‍ती पंचनामा कसा करावा ?
  • आपत्‍तीग्रस्‍त व्‍यक्‍तीना मदत करताना कोणते निकष आवश्‍यक असतात ?
  • आपत्‍ती निकष बाबत शासन निर्णय 
  • आपत्‍ती प्रकार नुकसान भरपाई व निकष तक्‍ता 
या सर्व बाबी pdf स्‍वरुपात वाचणेसाठी click here to download

Tuesday 18 August 2015

मा. श्री. श्रीधर जोशी सर, (Ex-IAS) यांची प्रतिक्रिया

मा. श्री. श्रीधर जोशी सर, (Ex-IAS) यांना त्‍यांचे अतिशय प्रसिदध अशा विभागीय चौकशी ब्‍लॉग वरील माहिती घेणेकरीता मेल केला असता सरांनी खुप लवकर ब्‍लाॅ्ग वर भेट दिली व त्‍यांचे ब्‍लाॅग वरील माहिती या ब्‍लाॅगवर शेअर करणेस परवानगी दिली आहे. तसेच सरांनी त्‍यांची प्रतिक्रिया ही दिली .कामात खुप व्‍यस्‍त असताना ही सरांनी वेळात वेळ काढुन ब्‍लॉग ला भेट व प्रतिक्रिया दिलेने सरांचे खुप खुप धन्‍यवाद ........
                                               

Monday 17 August 2015

अभिलेख कक्षातील कागदपत्रांची यादी व वर्गीकरण




  •  कोणकोणत्‍या प्रकारची कागदपत्रे असतात? 
  •  त्‍यांचे वर्गीकरण कसे करतात? 
  •  त्‍यांना किती काळ जतन करावे ?
  •  नष्‍ट कधी करावे 
  •  याबाबत आणारे कायदेशीर तरतुदी कोणत्‍या ?
  • कोणकोणती कागदपत्रे कोणत्‍या प्रकारात मोडतात ?
या सर्व बाबी सहज लक्षात यावे यासाठी लेख व तक्‍ता स्‍वरूपात माहिती तयार केली आहे.PDF वाचणेसाठी येथे क्लिक करा 
लेखक 
                       लेख                                                              तक्‍ता 
श्री.मोहसिन शेख तलाठी ता. कर्जत            श्री.शशिकांत जाधव ना तहसिलदार सावंतवाडी 













Sunday 16 August 2015

CRPC 107, 109 आणि 110 नुसार करावयाची कार्यवाही

CRPC 107, 109 आणि 110 नुसार करावयाची कार्यवाही  :-

.
  • रिपोर्टींग वेळी काय करावे ?
  • सुनावणीवेळी काय करावे ?
  • आदेशाची अंमलबजावणी कशी करावी ?
  • CRPC 107, 109 आ णि 110 थोडक्‍यात महत्‍वाचे 
या सर्व बाबी जाणुन घेणेसाठी श्री.शशिकांत जाधव, ना. तहसिलदार, सावंतवाडी यांनी तयार केलेली माहिती वाचणेसाठी येथे क्लिक करा

Friday 14 August 2015

महसुल विभागाकडुन करणेत येणारे वेगवेगळे दंड तरतुदी व कलम


खालील प्रत्‍येक बाबतीत महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्‍या तरतुदींचे अाधारे कारवाई करावी ? सविस्‍तर तरतुदी व कलम पाहण्‍यासाठी click here to download pdf
  1. अनाधिकृत उत्‍खनन 
  2. अनाधिकृत  वाहतूक
  3. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण 
  4. विनापरवाना हाॅटेल
  5. अनाधिकृत बिनशेती
  6. अनाधिकृत बांधकाम 
  7. अनाधिकृत घरगुती गॅस वापर
  8. हद्दीच्‍या निशाणी नष्‍ट करणे 
  9. अनाधिकृत  झाडतोड
  10. अनाधिकृत केबल
  11. अनाधिकृत  व्हिडिओ गेम
  12. अनाधिकृत पाणी वापर
  13. अनाधिकृत पेट्रोल पंप
  14. अनाधिकृत धान्‍य दुकान 
  15. व्हिडिओ बसेस वरील करमणुक कर आकारणी 
  16. अनाधिकृत मोबाईल टॉवर   
श्री.शशिकांत जाधव, ना.तहसिलदार महसुल ( सावंतवाडी )



Thursday 13 August 2015

विविध वर्ग -2 जमिनींचे हस्‍तांतरणाबाबत माहिती तक्‍ता

वर्ग -2 जमिनी हस्‍तांताणाबाबत नेहमी पडणारे प्रश्‍न 
  • विविध वर्ग 2 जमिनी कोणत्‍या ?
  •  या जमिनींचे हस्‍तांतरण करावयाचे असलेस कोण सक्षम अधिकारी आहेत ?
  • वर्ग 2 जमिनी हस्‍तांतरण परवानगी देताना आवश्‍यक कायदेशीर तरतुदी कोणत्‍या ?
  •  विविध प्रकारचे वर्ग 2 जमिन हस्‍तांतरण करताना भरावयाचे नजराणा रकमेचे स्‍वरूप कसे असावे ?याबाबत श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार यांनी सविस्‍तर माहिती देणारा तक्‍ता तयार केला आहे तो  पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा

Sunday 2 August 2015

माझे लेख सदरातील लेख क्रमांक 3 व लेख क्रमांक 4 अवश्‍य वाचा

महसुल मित्रांसाठी आवश्‍यक जमाबंदी व साल अखेर तसेच 7/12 प्रमाणे क्षेत्राचा आकार काढणे याबाबत ब्‍लॉगवरील लेख क्रमांक 3 व लेख क्रमांक 4 अवश्‍य वाचा...........
लेख क्रमांक 4 वाचा


लेख क्रमांक 3 जमाबंदी व साल अखेर वाचणेसाठी येथे click here


Saturday 1 August 2015

शेतकरी आत्‍महत्‍या रोखणे बाबत समित्‍यांची स्‍थापना

शेतकरी आत्‍महत्‍या रोखणेकामी शासनाने जिल्‍हास्‍तरीय व ग्रामस्‍तरीय समिती स्‍थापन करणेचा निर्णय घेतला शासन निर्णय पहा