Sunday, 10 December 2017

अभिलेख कक्षातील कागदपत्रांची यादी व वर्गीकरण

 • कोणकोणत्‍या प्रकारची कागदपत्रे असतात? 
 • त्‍यांचे वर्गीकरण कसे करतात? 
 • त्‍यांना किती काळ जतन करायचे ?
 • किंवा नष्‍ट कधी करावे?
 • याबाबत कायदेशीर तरतुदी कोणत्‍या ?
 •  कोणत्‍या कागदपत्रे कोणत्‍या गटात मोडतात 
या सर्व बाबी जाणुन घेणेकरीता लेख व तक्‍ता स्‍वरूपात माहिती तयार केली आहे.PDF वाचणेसाठी येथे क्लिक करा

Sunday, 3 December 2017

महसूल कामकाज पुस्तिका

 लिपिक ,तलाठी, महसूल अधिकारी व सामान्य शेतकरी यांचेसाठी उपयुक्त डॉ.संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी ,परभणी  यांचे  महसूल कामकाज पुस्तिका हे पुस्तक प्रथमच ब्लॉग वर प्रसिद्ध करत आहोत.
हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महसूल कामकाज पुस्तिका

Sunday, 26 November 2017

महत्वपूर्ण न्यायालयीन निकाल

महसूल मध्ये कामकाज करत असताना अनेक वेळा न्यायालयीन निकाल यांचा संदर्भ ,मार्गदर्शक सूचना यांचा वापर करावा लागतो.परंतु असे निकाल ,मार्गदर्शक तत्वे आपल्याला वेळेप्रसंगी प्राप्त होत नाही त्यामुळे अनेक ग्रुप वरील न्यायलयीन निकाल तसेच मा.शशिकांत सर जाधव यांचे संकलनातून बरेच निकाल प्राप्त करून ते सर्व निकाल mohsin7-12.blogspot.in वरील नवीन  tab मध्ये संकलित केले जाणार आहेत तसेच कोणाकडे इतर निकाल असतील तेही मला पाठवावेत म्हणजे सर्व महत्वपूर्ण निकाल एकाच ठिकाणी नेहमी उपलब्ध राहतील व हव्या त्यावेळी प्राप्त करून कामकाज करता येईल. यासाठी महत्वपूर्ण न्यायालयीन निकाल या ब्लॉगवरील tab वर भेट देऊन प्राप्त करून घ्यावे.

1.निवडणूक विभाग 
1. श्री. अर्जुन खोतकर, आमदार जालना यांची निवडणुक अवैध ठरवलेबाबतचा औरंगाबाद खंडपीठा निकाल......... यात पान नं 49 ते 65 मध्ये RO & ARO च्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत........ तसेच निवडणुक प्रक्रियेमध्ये
 व्हिडीओ शुटींग करताना काय काळजी घेतली पाहीजे, 65ब चे प्रमाणपत्र कोणी दिले पाहीजे, आयोगाची भुमिका, RO & ARO ची जबाबदारी इ. बाबत भाष्य केले आहे..... भविष्यातील निवडणुकांसाठी सर्व RO & ARO यांना हे मार्गदर्शक ठरेल.
 हा निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा


2.कुळकायदा/महसूल अर्धन्यायिक बाबत  विभाग 

1.वहिवाट बाबत मा.सर्वोच्च न्यायालय यांचा निकाल मराठी भाषांतर -डॉ.संजय कुंडेटकर सर

हा निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा


2..मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ बाबत मा.उच्चन्यायालय यांचा निकाल
निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा


3.आस्थापना विभाग 

1.विभागीय चौकशी जास्तीत जास्त 6 महिन्यात पूर्ण करावी याबाबत मा.सर्वोच्च न्यायालय यांचा निकाल आहे तो निकाल प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा2.रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जातीचे प्रमाणपत्र बाबत न्यायालयाने दिलेला निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


4.माहितीचा  अधिकार अधिनियम 2005 विभाग 

1.एखादा निर्णय का व कसा दिला हे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विचारता येणार नाही याबाबत न्यायलयाने दिलेला निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Monday, 6 November 2017

उत्पन्न अहवाल

राज्यातील तलाठी २ ऑक्टोबर २०१७ पासून  उत्पन्न दाखले बंद आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शुद्धीपत्रक क्र.संकीर्ण -२०१७/प्र.क्र.७४/ई-१अ दि.०३/११/२०१७ नुसार तलाठी यांनी उत्पन्न अहवाल हा तहसिलदार यांना सादर करणेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.शासन निर्णयप्रमाणे अर्ज नमुना व उत्पन्न अहवाल तयार केलेला असून त्याबाबत वर्ड फाईल खालील लिंक वरून क्लिक करून प्राप्त करून घ्यावी व आवशयक वाटल्यास बदल करावा.

उत्पन्न अर्ज व अहवाल साठी खालील लिंक वर क्लिक करा.  

Thursday, 19 October 2017

पुरवठा विभाग


पुरवठा हा महसूल विभागातील अत्यंत महत्वपूर्ण भाग बनला आहे.पुरवठा विभागात तपासणी या भागास अनन्यसाधारण महत्व असून धान्य पुरवठा ,शासकीय गोदाम,आणि अन्य तपासण्या याबाबत पुरेसे साहित्य उपलब्ध नसलेने डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी परभणी यांनी विस्तृत माहिती देणारा लेख लिहिला आहे. तसेच श्री.राजेंद्र शिंदे सर, तहसील कार्यालय,पारनेर यांनी तपासणी करणेसाठी आवश्यक फॉर्मचा उत्तम नमुना उपलब्ध करून दिला आहे.सदर लेखामध्ये खालील मुद्द्यांबाबत सखोल माहिती देणेत आलेली आहे

 • शिधापत्रिका –प्रकार व देण्याचे निकष ,आवश्यक कागदपत्रे
 • धान्य वितरण बाबत महत्वाच्या योजना
 • शासकीय गोदाम व तपासणीचा अधिकार
 • धान्य गोदामात ठेवण्यात येणाऱ्या नोंदवह्या व फॉर्म्स
 • सखोल गोदाम तपासणी कार्यवाही
 • दक्षता समिती
 • अन्न सुरक्षा अधिनियम -२०१३
 • विविध तपासणी नमुने –रास्त भाव दुकान ,केरोसीन ,पेट्रोल पंप इ. 

संपूर्ण लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
Monday, 17 July 2017

सुधारित महाराष्ट्र जमिन महसूल नियमपुस्तिका खंड -चार

तलाठी दप्तरातील आत्मा समजला जाणारा आणि ज्या खंडाचे वाचन प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकारी यांना आवश्यक आहे तो खंड म्हणजे महाराष्ट्र जमिन महसूल नियमपुस्तिका खंड चार. अशी महसूली नियमपुस्तिका सहज ,सोप्या पद्धतीने मोबाईल किंवा संगणकावर वाचन करता यावे यासाठी ही नियमपुस्तिका मा.श्री.प्रल्हाद कचरे सर ,उपायुक्त (महसूल) औरंगाबाद यांनी Ebook स्वरुपात तयार केली आहे. हे eBook वाचताना आपण मोबाईल किंवा संगणकावर हव्या त्या पेज वर,प्रकरणावर किंवा कलमावर एक क्लिक करून सहज जाऊ शकता.सदर पुस्तक मोबाईल किंवा संगणकावर प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Sunday, 9 July 2017

महसूल विभागामार्फत मिळणाऱ्या विविध परवानग्या

महसूल विभागाकडून अनेक परवानग्या दिल्या परंतु हे परवानगी देणारे अधिकारी कोण आहेत? त्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात ? याबाबत कोणकोणते शासन निर्णय आहेत ?  या सर्व बाबी बाबत नेहमी प्रश्न विचारले जातात त्यामुळे मा.डॉ.संजय कुंडेटकर,सर यांनी महसूल शाखानिहाय परवानगी बाबत माहिती देणारे लेख लिहिले आहेत.हे लेख वाचन करून महसूल विभागातील परवानगी बाबत असणारी सर्व शंका यांचे नक्की समाधान होईल माहिती प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.